धक्कादायक! तलवारीचा धाक दाखवत आपल्या 5 मुलींवर वडिलांचा गेले 4 वर्षे बलात्कार; दोन लग्न झालेल्या मुलींवरही अत्याचार
एकूण आठ मुली असलेल्या या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन बहिणी आणि त्यांच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदौरमध्ये बलात्कार (Rape) संदर्भात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कलियुगातील पिता आपल्या पाच मुलींवर तब्बल 4 वर्षांपासून बलात्कार करत असल्याची माहिती मिळत आहे. एकूण आठ मुली असलेल्या या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन बहिणी आणि त्यांच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. आरोपी ठेकेदारीचे काम करतो. रोज रात्री घरी दारू पिऊन येऊन तो पाच मुलींपैकी एकीवर बलात्कार करत असे. आरोपी खरगोन जिल्ह्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याची ओळख उघड केली नाही. आश्चर्य म्हणजे बलात्काराची शिकार झालेल्या दोन मुलींची लग्ने झालेली आहेत.
तक्रार केलेल्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ‘15 दिवसांपूर्वी तिची 15 वर्षांची मुलगी खूप रडत होती. ती इतकी घाबरली होती की तिचा आवाजही फुटत नव्हता. आईने तिला एकांतात विचारले असता, तिने रडत पित्याने केलेल्या दुष्कृत्याची माहिती दिली. वडील तलवारीचा धाक दाखवून गेले वर्षभर बलात्कार करत असल्याचे तिने सांगितले. तसेच इतर बहिणींसोबतही हे चालू असल्याचे सांगितले. त्यानंतर आईने आपल्या इतर मुलींना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनीही वडील आपल्यावर अनेक वर्षांपासून बलात्कार करत असल्याची माहिती दिली. (हेही वाचा: आजोबांनी केला आपल्या नातीवर बलात्कार, भावाचाही सहभाग; पिडीत मुलगी गर्भवती)
याबाबत कोणाला काही सांगितले तर त्यांच्या 5 वर्षांच्या लहान भावाला आणि आईला मारून टाकण्याची धमकी वडील देत असे. यामुळे घाबरून मुलींनी कोणालाही काही सांगितले नाही. आईने याबाबत जाब विचारला असता वडील आईवर तलवार घेऊन धावून गेले. त्यानंतर मंगळवारी या महिलेने आपल्या मुलींसह पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करता या सैतानाला अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे.