Report On Housing Prices: दिल्ली आणि मुंबईत घर खरेदी करणं झालं महाग! गेल्या पाच वर्षांत 50 टक्क्यांनी वाढल्या घरांच्या किमती
उत्पादन खर्च आणि चांगली विक्री यामुळे किमतीत ही वाढ झाल्याचे Anarock च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2016 पासून 2019 पर्यंत दोन्ही प्रदेशातील किमती स्थिर राहिल्या. कोविड-19 साथीचा रोग या दोन निवासी बाजारपेठांसाठी वरदान ठरला, ज्यामुळे मागणी नवीन उंचीवर गेली.
Report On Housing Prices: उच्च मागणीमुळे दिल्ली (Delhi) आणि त्याच्या लगतच्या भागात आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) मधील निवासी मालमत्तांच्या सरासरी किमती गेल्या पाच वर्षांत सुमारे 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. रिअल इस्टेट सल्लागार Anarock च्या आकडेवारीनुसार, NCR मधील निवासी मालमत्तांची सरासरी किंमत जानेवारी-जून 2024 दरम्यान 49 टक्क्यांनी वाढून 6,800 रुपये प्रति चौरस फूट झाली आहे. जी 2019 मध्ये याच कालावधीत 4,565 रुपये प्रति चौरस फूट होती. त्याचप्रमाणे, MMR मधील निवासी मालमत्तेची सरासरी किंमत 2024 च्या पहिल्या सहामाहीत 48 टक्क्यांनी वाढून 15,650 रुपये प्रति चौरस फूट झाली आहे. जी 2019 मध्ये याच कालावधीत 10,610 रुपये प्रति चौरस फूट होती.
उत्पादन खर्च आणि चांगली विक्री यामुळे किमतीत ही वाढ झाल्याचे Anarock च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2016 पासून 2019 पर्यंत दोन्ही प्रदेशातील किमती स्थिर राहिल्या. कोविड-19 साथीचा रोग या दोन निवासी बाजारपेठांसाठी वरदान ठरला, ज्यामुळे मागणी नवीन उंचीवर गेली. सुरुवातीला, विकासकांनी ऑफर आणि फ्रीबीजसह विक्री प्रवृत्त केली. परंतु, मागणी वाढल्यावर घरांच्या सरासरी किमती वाढवण्यात आल्या, असंही ॲनारॉक यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Global Luxury Real Estate Markets: जगात सर्वात महागड्या घरांच्या शहरांच्या यादीत मुंबई 8 व्या क्रमांवर; लक्झरी हाऊसिंग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ- Reports)
लिस्टेड रिॲल्टी फर्म TARC Ltd MD आणि CEO अमर सरीन यांनी सांगितलं की, गेल्या पाच वर्षांमध्ये NCR प्रदेशात घरांच्या किमतीत झालेली मोठी वाढ पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि वर्धित कनेक्टिव्हिटीमुळे वाढलेली मागणी दर्शवते. हा कल या प्रदेशाच्या शाश्वत विकासाच्या संभाव्यतेला आणि गुंतवणुकीच्या संधीला अधोरेखित करतो. (हेही वाचा -Mumbai Real Estate Prices: मुंबईच्या BKC परिसरातील रिअल इस्टेटच्या किंमती न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनपेक्षा दुप्पट; उद्योजक Uday Kotak यांनी व्यक्त केले आश्चर्य)
गुरुग्रामस्थित प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्म व्हीएस रिअल्टर्स (आय) प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ विजय हर्ष झा यांनी सांगितलं की, साथीच्या रोगापासून NCR मध्ये निवासी मालमत्तांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. लोक अधिक प्रशस्त घरे असण्यास प्राधान्य देत आहेत. एक प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून एनसीआरची स्थिती देखील दिल्ली-एनसीआर प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. (हेही वाचा -Luxury Real Estate: लक्झरी घरांच्या किंमतीबाबत जगात मुंबई तिसऱ्या, तर दिल्ली पाचव्या स्थानावर; Knight Frank च्या अहवालात समोर आली माहिती)
रॉयल ग्रीन रियल्टीचे व्यवस्थापकीय संचालक यशांक वासन यांनी सांगितलं की, उच्च मागणी, सुधारित कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांचा विकास आणि धोरणात्मक शहरी नियोजन यामुळे दिल्ली-एनसीआरमधील घरांच्या किमती वाढल्या आहेत. बहादूरगडसह दिल्ली-एनसीआरमधील आणि आसपासच्या सर्व प्रमुख स्थानांमध्ये घरांच्या किमतींमध्ये तीव्र वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआर आणि लगतच्या शहरांमधील मालमत्तेच्या किमती वाढण्यामागे रस्ते पायाभूत सुविधांचा विकास हा एक प्रमुख घटक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)