Bus Fighting In Chhatrapati Sambhajinagar: बस थांबवण्यावरून वाद, एसटी महिला कंडक्टर आणि प्रवाशीत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरचा व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजी नगर येथील पाचोड एसटी बसस्थानकावर महिला कंडक्टर आणि प्रवाशी यांच्यात जोरदार मारामारी झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. बस थांबवण्यासाठी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारी झाली. धुळे ते सोलापूर दरम्यान पाचोड बसस्थानक रस्त्यावर आहे. पाचोड बसस्थानकावर सर्व बसेस थांबतात, मात्र काही बसचालक याठिकाणी बस थांबवत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओ पहा:
View this post on Instagram
साम मराठी न्यूजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एसटी बसचा चालक आणि वाहकासोबत प्रवाशांचा वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

