Gujarat Bus Accident: गुजरातमध्ये बसचा भीषण अपघात, सात जण दगावले, 14 जण जखमी
बस दुभाजकाला ओलांडून समोरून येणाऱ्या तीन वाहनांना धडकली आहे. या घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी देण्यात आली.
Gujarat Bus Accident: गुजरात (Gujarat) येथील द्वारकाजवळ एका बसचा (Bus Accident) अपघात झाला आहे. बस दुभाजकाला ओलांडून समोरून येणाऱ्या तीन वाहनांना धडकली आहे. या घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी देण्यात आली. (हेही वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी दाखल केला पुरवणी अंतिम अहवाल; अल्पवयीन आरोपींविरुद्ध पुरावे नष्ट करणे, बनावटगिरी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, बस अनिंयत्रित झाल्याने हा अपघात घडला. बस चालकाने रस्त्यावरील गुरे वाचवण्याचा प्रयत्न केला असताना बस अनिंयत्रित झाली त्यानंतर बस दुभाचकाला ओलाडली आणि तेवढ्यात तीन वाहनांची धडक लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. हेतलबेन अर्जुनभाई ठाकोर, प्रियांशी महेशभाई ठाकोर, तान्या अर्जुनभाई ठाकोर, हिमांशू किशनभाई ठाकोर, आणि गांधीनगर येथील वीरेंद्र किशनभाई ठाकोर आणि बराडिया येथील चिराग भाई अशी मृतांची नावे आहेत.
घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, गुजरातच्या द्वारका जिल्ह्याजवळील द्वारका खंबालिया राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सांयकाळी 7.45च्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना तात्काळ खंभलिया शहारतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.