त्रिपुराच्या भीषण बस अपघातात 29 जवान जखमी

त्रिपुराच्या बारामुरा येथे सोमवारी रात्री एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

त्रिपुराच्या भीषण बस अपघातात 29 जवान जखमी
त्रिपुरा बस अपघात (फोटो सौजन्य - ANI)

त्रिपुराच्या बारामुरा येथे सोमवारी रात्री एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले असून 29 जवान गंभीर आहे.

या घटनेतील सर्व जवान हे इलेक्शनच्या येथे लागलेल्या ड्युटीसाठी जात होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या सर्व जखमी जवानांना बारामुरा येथील नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2018 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).