Bulandshahr Double Murder: बुलंदशहरमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ, काका-पुतण्याची चाकू भोकसून हत्या

काका-पुतण्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. दोघांचे मृतदेह गंगानगरच्या रुळावर फेकण्यात आले होते. सुधीर गर्ग आणि राजीव गर्ग अशी मृतांची नावे आहेत. दोघांवर चाकूने अनेक वार करण्यात आले, जाणून घ्या अधिक माहिती

Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

Bulandshahr Double Murder: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. काका-पुतण्याची  चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. दोघांचे मृतदेह गंगानगरच्या रुळावर फेकण्यात आले होते. सुधीर गर्ग आणि राजीव गर्ग अशी मृतांची नावे आहेत. दोघांवर चाकूने अनेक वार करण्यात आले. मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडले होते. बुलंदशहर एसएसपीसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. एसएसपी म्हणाले, “पोलीस ठाण्याच्या कोतवाली देहाट परिसरात दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. ते एकमेकांशी संबंधित आहेत. यातील एक जण सार्वजनिक सुविधा केंद्र चालवतो. दोघेही सार्वजनिक सुविधा केंद्रात गेले होते. वास्तविक, दोघांनाही कोणाला तरी कागदपत्र द्यायचे होते.

त्याचवेळी त्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका  व्यक्तीने त्यांना स्कूटरवरून खाली उतरवले होते, पण त्यानंतर तो घरी परतला नाही.” एसएसपी पुढे म्हणाले, “आता त्यांचे मृतदेह सापडले आहेत. शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

कुटुंबीयांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तथ्यांच्या आधारे आमच्या पथकाने घटनेचा तपास सुरू केला आहे. त्याचवेळी, या प्रकरणात संशयित आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. लवकरच या घटनेवरून पडदा उचलला जाईल.