Telangana Bridge Collapses Due to Strong Winds: तेलंगणातील मनैर नदीवरील बांधकामाधीन पूल कोसळला, कोणतीही जीवीतहानी नाही
हा पूल जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील गार्मिलेपल्ली गावाशी ओडेडूला जोडण्यासाठी बांधला जात होता. 2016 मध्ये पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. त्याची अंदाजे किंमत 47.40 कोटी रुपये असून तो एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.
Telangana Bridge Collapses Due to Strong Winds: तेलंगणातील (Telangana) पेड्डापल्ली जिल्ह्यातील मनैर नदीवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळला. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुथाराम मंडलातील ओडेडू गावात ही घटना घडली. ज्यामध्ये जोरदार वाऱ्यामुळे दोन गर्डर पडले. सुदैवाची बाब म्हणजे घटनास्थळी कोणीही नसताना रात्री उशिरा ही घटना घडली. मंगळवारी या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. एक किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम 2016 पासून सुरू आहे. मात्र, कंत्राटदार बदलल्याने आणि निधीअभावी बांधकामाला सातत्याने विलंब होत होता.
हा पूल जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील गार्मिलेपल्ली गावाशी ओडेडूला जोडण्यासाठी बांधला जात होता. 2016 मध्ये पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. त्याची अंदाजे किंमत 47.40 कोटी रुपये असून तो एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. (हेही वाचा -Indian Student Died in Kyrgyzstan: आंध्र प्रदेशातील वैद्यकीय विद्यार्थ्याचा किर्गिस्तानमध्ये धबधब्यात बुडून मृत्यू, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर)
पूल पूर्ण झाल्यानंतर मंथनी, परकल, भूपालपल्ली आणि जम्मीकुंता शहरांमधील अंतर सुमारे 50 किलोमीटरने कमी होईल. पुलाखालील तात्पुरता रस्ता स्थानिक लोक वाहतुकीसाठी वापरत होते. ठेकेदाराने काम अर्ध्यातच थांबवल्याने आठ वर्षे उलटूनही पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे संतप्त स्थानिकांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)