Bride And Groom Kiss At UP Wedding: उत्तर प्रदेशमध्ये लग्नात वधू-वराने घेतले चुंबन; कुटुंबात लाठ्या-काठ्याने मारहाण

हापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणत्याही कुटुंबाकडून कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही.

Marriage (PC - Pixabay)

Bride And Groom Kiss At UP Wedding: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सोमवारी एका वराला आपल्या वधूचे चुंबन घेणं चांगलंच महागात पडलं आहे. वर्माळा समारंभात नवविवाहित जोडप्याने चुंबन घेतल्याने वधूच्या कुटुंबाने मंचावरील वराच्या नातेवाईकांवर हल्ला केल्याने हापूरच्या अशोक नगरमधील लग्नाचे ठिकाण रणांगणात बदलले. वराच्या या कृत्याने संतापलेल्या दोन्ही कुटुंबात वाद सुरू झाला. काही वेळातच वधूच्या कुटुंबातील सदस्य काठ्यांनी मंचावर चढले. त्यांनी वराच्या नातेवाईकांवर हल्ला केला. या हाणामारीत वधूच्या वडिलांसह सहा जण जखमी झाले.

या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि दोन्ही कुटुंबातील सात जणांना ताब्यात घेण्यात आले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधूच्या वडिलांनी सोमवारी रात्री आपल्या दोन मुलींचे लग्न लावले होते. पहिल्या लग्नाचा समारोप कोणत्याही समस्यांशिवाय झाला, तर दुसऱ्या समारंभाने वाईट वळण घेतले. (हेही वाचा -Family Tries To Kidnap Bride: लग्नामध्ये चक्क वधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वराच्या कुटुंबावर मिरचीपूडचा हल्ला (Video))

वधूच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, वराने मंचावर तिचे बळजबरीने चुंबन घेतले, तर वराने असा दावा केला की वधूने वरमाला समारंभानंतर चुंबन घेण्याचा आग्रह धरला होता. हापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणत्याही कुटुंबाकडून कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

या सहा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 151 अंतर्गत सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif