IPL Auction 2025 Live

Kanpur Schools Bomb Threat: दिल्लीनंतर कानपूरमध्ये अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; रशियन सर्व्हरवरून आला ईमेल

ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. नझिराबादमधील सनातन धर्म मंदिर शाळा, बारा केडीएमए शाळेसह 10 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.

(Photo Credits File)

Kanpur Schools Bomb Threat: कानपूरमधील 10 शाळांना उडवण्याची धमकी मिळाली (Kanpur Schools Bomb Threat) आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. नझिराबादमधील सनातन धर्ममंदिर शाळा, बारा केडीएमए शाळेसह 10 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.धमकीच्या ईमेलनंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह रात्री उशिरा सर्व शाळांची तपासणी (Schools Inspection) केली. सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन शाळांची सुरक्षा (Security) वाढवण्यात आली आहे. सध्या तपासात काहीही समोर आलेले नाही. हे ईमेल रशियन सर्व्हरवरून तयार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (हेही वाचा:Delhi Hospitals Receive Bomb Threat Calls: दिल्लीतील 4 रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर )

सहायक पुलिस आयुक्त कानपुर हरीश चंद्र यांनी सांगितले की, शाळांवर बॉम्ब हल्ला करण्यात येईल, असा ईमेल पाठवण्यात आला. सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. शाळेचे व्यवस्थापक आणि पालकांना आवाहन करून न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. पुढे ते म्हणाले की अशा प्रकारचे ईमेल यापूर्वीही आले होते, खबरदारी म्हणून आम्ही आवश्यक ती पावले उचलत आहोत.

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या दिल्याची प्रकरणे घडली होती. यापूर्वी देशाची राजधानी दिल्ली, जयपूर आणि लखनऊ येथील शाळांनाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.