BMW Rams Bike In Mohali: भरधाव BMW ने दिली मोटारसायकलस्वारांना धडक; एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिलेल्या दुचाकीवर तिघेजण जात होते. त्यापैकी 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

Accident (PC - File Photo)

BMW Rams Bike In Mohali: पंजाब (Panjab) मधील मोहाली (Mohali) येथे भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कार (BMW Car) मुळे भीषण अपघात (Accident) झाला. बीएमडब्ल्यू कारने मोटारसायकलस्वारांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील इतर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहाली जिल्ह्यातील झिरकपूर पटियाला महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिलेल्या दुचाकीवर तिघेजण जात होते. त्यापैकी 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

मृतांच्या कुटुंबीयांनी रात्री पतियाळा महामार्ग बंद केला. मिळालेल्या माहितीनुसार, बानुदकडून भरधाव वेगात येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने मोटारसायकलला धडक दिली. धडकल्यानंतर मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक आणि बीएमडब्ल्यू कारमध्ये अडकली. या अपघातात जाकीरचा मुलगा साहिब, सुमित मुलगा मलकित सिंग आणि राजवीर सिंग मुलगा जसबीर सिंग हे तिघेही गंभीर जखमी झाले. (हेही वाचा -Uttar Pradesh: ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करणच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले; 2 जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर)

रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तीन गंभीर जखमींना स्थानिक जेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, जेथे डॉक्टरांनी साहिबची प्रकृती पाहता त्यांना चंदीगड सेक्टर 32 रुग्णालयात रेफर केले. जिथे जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला, तर राजवीर आणि सुमितवर जेपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कारचा वेग इतका वेगवान होता की, अपघातानंतर बीएमडब्ल्यू कारच्या सर्व एअर बॅग उघडल्या गेल्या.