IPL Auction 2025 Live

Black Ink Thrown on Rakesh Tikait: कर्नाटकात राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक; पत्रकार परिषदेत गोंधळ, Watch Video

राजधानी बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत या घटनेनंतर बराच गदारोळ झाला.

राकेश टिकैत यांच्यावर शाई फेक (PC - ANI)

Black Ink Thrown on Rakesh Tikait: कर्नाटकात पोहोचलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि युधवीर सिंग यांना नाराजीला सामोरे जावे लागले. कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांवर शाई फेकण्यात आली. टिकैत यांनी सांगितलं की, शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. राजधानी बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत या घटनेनंतर बराच गदारोळ झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टिकैत आणि सिंह कर्नाटकचे शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्या स्टिंग ऑपरेशनशी संबंधित व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण देत होते. हे स्टिंग ऑपरेशन एका वाहिनीने केले होते. ज्यामध्ये कोडिहल्ली पैशांची मागणी करताना दिसले होते. टिकैत यांनी राज्य सरकारवर 'शाई हल्ला'चा आरोप केला आहे. येथे स्थानिक पोलिसांनी कोणतीही सुरक्षा पुरवली नव्हती. हे सर्व सरकारच्या संगनमताने घडले असल्याचे टिकैत यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Gangster Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई कोण आहे? ज्याच्या टोळीने दिवसाढवळ्या केली Sidhu Moose Wala ची हत्या; सलमान खानलाही दिली होती जीवे मारण्याची धमकी)

पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर शेतकरी नेते कोडिहल्ली यांच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार आणि राजकारणी यांच्यात प्रश्नोत्तराची फेरी सुरू असताना काही लोकांनी त्यांच्यावर काळी शाई फेकली.

दरम्यान, तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर वर्षभराहून अधिक काळ शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे आता एकटे पडलेले दिसत आहेत.