BJP's Third Straight Win In 2024 Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा जिंकणार! ब्रिटीश वृत्तपत्राने मोदी सरकारबाबत केलं भाकीत
प्रादेशिक आणि केंद्रीय पातळीवर भाजप सातत्याने मजबूत होत आहे. त्याचबरोबर तेलंगणात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने बाजी मारली असली तरी अंतर्गत कलहामुळे पक्ष कमकुवत दिसत आहे. स्तंभात पुढे विरोधी पक्ष I.N.D.I. युतीचाही उल्लेख आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष अजूनही एकजूट नाही, असंही लेखात सांगण्यात आलं आहे.
BJP's Third Straight Win In 2024 Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लोकप्रियतेची जगभरात चर्चा आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली 2023 साली भाजपने तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2023) जिंकल्या. त्याचवेळी अयोध्येत 22 जानेवारीला भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. या सर्व मुद्द्यांमुळे भारतीय जनता पक्षाच्या ताकदीची जगभर चर्चा होत आहे. 'द गार्डियन' (The Guardian) या ब्रिटीश वृत्तपत्राच्या एका स्तंभात भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) विजयाची हॅट्ट्रिक करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयामुळे पक्ष आणखी मजबूत झाला आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे, असे हॅना एलिस-पीटरसन यांनी आपल्या स्तंभात नमूद केले आहे. (हेही वाचा - Ayodhya Surya Stambh Viral Video: राम नगरी अयोध्या सजणार सूर्यस्तभांनी, तीस फूट उंचीचे खांब शहराच्या मुख्य रस्त्यावर)
तीन राज्यांतील विधानसभा विजयानंतर पंतप्रधान मोदींनी स्वत: लोकसभा निवडणुका 2024 च्या विजयाचा दावा केला होता. या स्तंभात पुढे असे लिहिले आहे की, 'पंतप्रधानांची लोकप्रियता, भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी अजेंड्यामुळे पक्षाला देशातील मोठ्या हिंदू बहुसंख्यांचा पाठिंबा मिळेल.
सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी युती केली आहे. मात्र, महत्वाच्या मुद्द्यांवर अद्याप एकत्र आलेले नाही. तरीही त्यांनी एकत्रितपणे भाजपशी लढण्याची शपथ घेतली आहे. परंतु, यातून सामान्य अर्थ असा आहे की, या टप्प्यावर भाजपचा विजय जवळजवळ अपरिहार्य आहे, असं सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फेलो नीलंजन सरकार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Ayodhya Ram Temple: अयोध्येत श्री राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनाप्रसंगी PM Narendra Modi राहणार उपस्थित; ट्रस्टकडून मिळाले निमंत्रण)
प्रादेशिक आणि केंद्रीय पातळीवर भाजप सातत्याने मजबूत होत आहे. त्याचबरोबर तेलंगणात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने बाजी मारली असली तरी अंतर्गत कलहामुळे पक्ष कमकुवत दिसत आहे. स्तंभात पुढे विरोधी पक्ष I.N.D.I. युतीचाही उल्लेख आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष अजूनही एकजूट नाही, असंही लेखात सांगण्यात आलं आहे.
तथापी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप येत्या दोन महिन्यांत ‘विकास भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून देशभरातील शहरे आणि गावांमध्ये हजारो कार्यकर्त्यांना तैनात करणार आहे. संरक्षण मंत्रालय युद्ध स्मारके, संरक्षण संग्रहालये, रेल्वे स्थानके आणि पर्यटन स्थळांवर 822 'सेल्फी पॉइंट' देखील तयार करत आहे, जेथे लोक पंतप्रधान मोदींच्या कटआउटसह त्यांचा फोटो काढू शकतात, असे द गार्डियनने वृत्त दिले आहे.
बिहार आणि महाराष्ट्र यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये पक्षाची स्थिती अनिश्चित राहिली आहे आणि 'नोकरी आणि महागाई' यासारख्या समस्यांमुळे मतदानाच्या पद्धतींवर परिणाम होऊ शकतो, असे या स्तंभात नमूद करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)