Lok Sabha Elections 2019: 'भाजप'ची पहिली उमेदवार यादी जाहीर; महाराष्ट्रात या लोकांना मिळाली उमेदवारी

या यादीमध्ये 182 उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गांधीनगर इथून अमित शहा निवडणूक लढवणार आहेत.

BJP Election Committee Incharge JP Nadda | (Photo Credits: Twitter/BJP4India)

भारतीय जनता पार्टी (BJP) ने गुरुवारी लोकसभा निवडणुक 2019 साठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये 182 उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गांधीनगर इथून अमित शहा निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना अनुक्रमे लखनऊ आणि नागपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यात पक्षाचे प्रमुख रामकृपाल यादव, मुजफ्फरनगरचे संजीव बल्याण, उत्तर कन्नडचे अनंत कुमार हेगडे, नोएडाचे महेश शर्मा, गाझियाबादचे व्ही के सिंग, धारवाडचे प्रल्हाद जोशी, बागपतचे सत्यपाल सिंह आणि चंद्रपूर येथील हंसराज अहिर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी –

नंदुरबार- हीना गावित

गडचिरोली- अशोक नेते

जालना- रावसाहेब दानवे

ईशान्य मुंबई- किरीट सोमय्या

उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन

बीड- प्रीतम मुंडे

रावेर- रक्षा खडसे

धुळे- सुभाष भामरे

नगर- सुजय विखे-पाटील

वर्धा- रामदास तडस

नागपूर- नितीन गडकरी

अकोला- संजय धोत्रे

सांगली- संजय पाटील

पुणे - गिरीश बापट

भिवंडी - कपील पाटील

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif