Chhapra Lady Doctor: ‘तीनदा गर्भपात करावा लागला, इतर कोणत्याही मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचे नव्हते’; प्रियकराचे प्रायव्हेट पार्ट कापणाऱ्या महिला डॉक्टरचे गंभीर आरोप (Watch Video)

त्यावर महिला डॉक्टरने तिच्यावर झालेल्या आत्याचारांचा खुलासा केला आहे. ज्यात गर्भपात, लग्नाबाबत फसवणूकीला ती सामोर गल्याचे म्हटले आहे.

Photo Credit -X

Chhapra Lady Doctor: बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरलने नगरसेवक (Councillor) असलेल्या तिच्या प्रियकराचे प्रायव्हेट पार्ट(Cuts Off Genitals) कापले. सदर महिला डॉक्टर आणि पीडित तरुण हे मागील प्रदीर्घ काळापासून लिव्ह इन रिलेशनशिप (Live-in Relationship) मध्ये होते. दरम्यान, प्रियकराकडून विवाहास आलेल्या संतापाच्या भरात महिलेने हे कृत्य केल्याचे सांगितले आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 1 जुलै रोजी ही घडना उघडकीस आली. लग्नास नकार दिल्याने प्रियकराचे गुप्तांग कापल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. महिला आणि तिच्या रक्तस्त्राव झालेल्या प्रियकराचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (हेही वाचा:Chhapra Lady Doctor: नगरसेवकाचे लिंग कापले, लग्नास नकार दिल्याने महिला डॉक्टरचे कृत्य; कथीत Live-in Relationship चा कठोर अंत )

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आरोपी डॉक्टर दावा करताना दिसत आहे की, पीडित डॉक्टरला तीन वेळा गर्भपात करावा लागला. व्हिडीओत तिने प्रियकराचे प्रायव्हेट पार्ट का कापले, असे विचारले असता, तिचा प्रियकर वारंवार लग्नापासून पळ काढत असल्याचे डॉक्टर महिलेने सांगितले. ती म्हणाली, 'मी हे रागाच्या भरात केले. मला त्याला मारायचे नव्हते. इतर कोणत्याही मुलीसोबत असा विश्वासघात पुन्हा होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.' असे महिलेने म्हटले आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पीडित महिला प्रभाग क्र. मधुरा ब्लॉकमध्ये 12, रक्ताच्या थारोळ्यात बेडवर वेदनेने रडताना दिसत आहे.

व्हिडीओ

सदर घटनेनंतर पोलिसांनी डॉ. अभिलाषा हिला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, पीडित नगरसेवक वेदप्रकाश सिंह आणि ती, दोघे मिळून पाठिमागील दोन वर्षांपासून पती-पत्नी म्हणून एकत्र राहात होते. दोघेही परस्परांशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. लग्नाचे अमिष दाखवून नगरसेवक असलेला तिचा कथीत प्रियकर पाठिमागील दोन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करत होता. दरम्यान, तिने त्याला विवाहाबद्दल विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, असे तिने सांगितले.