arrest

Bihar Shocker: बिहारमधील (Bihar) भागलपूरमध्ये एका व्यक्तीने दोन जणांची हत्या करून एका वृद्धाचा मृतदेह रस्त्यावर 500 मीटरपर्यंत ओढून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दिवसाढवळ्या घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Viral) होत आहे. ही घटना 15 ऑगस्ट रोजी पहाटे भागलपूरमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद आझाद असे आरोपीचे नाव असून तो फतेहपूर गावचा रहिवासी आहे. आरोपीला पोलीसांकडून अटक करण्यात आले आहे.

मारेकऱ्याने वृद्धाचा मृतदेह ओढत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारेकरी मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर खेचताना दिसतो आणि कार आणि ट्रकही जाताना दिसतात, परंतु प्रत्येकजण मृतदेह महामार्गावर खेचणाऱ्या मारेकरीकडे बघत राहतात. मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने राष्ट्रीय महामार्गावरील वृद्ध पुरुष आणि महिलेवर वीट, रॉड आणि लोखंडी साखळीने हल्ला केला. दोघांचाही मृत्यू झाल्याची खात्री होईपर्यंत मारेकऱ्याने त्यांना निघृणपणे हत्या केली आहे. त्यांची हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीने वृद्धाचा मृतदेह महामार्गावर ओढून नेण्यास सुरुवात केली आणि नंतर निघून गेला. काही वेळाने तो व्यक्ती घटनास्थळी परतला आणि त्याने मृत व्यक्तींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गोंधळ ऐकून काही गावकरी जमले आणि त्यांनी मारेकऱ्याला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मारेकऱ्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. मृत झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्धांची हत्या करणारा हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकलांग होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरात बेड्या ठोकल्या होत्या. मात्र घटनेच्या तीन दिवस आधी आरोपी पळून गेला होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.