Bihar Assembly Elections 2020: जर मुद्दे संपले असतील तर मुंबई येथून पाठवले जातील, बिहार विधानसभा निवडणूकीवर संजय राऊत यांनी साधला निशाणा

Sanjay Raut (Photo Credit: ANI)

Bihar Assembly Elections 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी बिहार विधानसभेच्या निवडणूकांचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून निवडणूकीसाठी जोरदार तयारी करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच राजकीय पक्ष सुद्धा निवडणूकांबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना बिहार मधील विधानसभा निवडणूकांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी असे म्हटले की, निवडणुका विकास, कायदे व्यवस्था आणि उत्तम शासनाच्या मुद्द्यांवरुन व्हावी. पण जर हे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून मुद्दे पाठवून देतो.

विधानसभेच्या निवडणूकांचा तारखा जाहीर होण्यापूर्वी राऊत यांनी कोरोना व्हायरस संबंधित प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी असे त्यांनी म्हटले की, देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर विधानसभा निवडणूका घेणे योग्य आहे का? कोरोना व्हायरसमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती यापूर्वी कधीच आली नव्हती. पुढे त्यांनी पुन्हा खरंच कोरोना व्हायरसचे संकट संपुष्टात आले आहे का? निवडणूकीसाठी ही स्थिती उत्तम आहे का?(Bihar Assembly Election 2020: बिहार येथे कशा होतील निवडणूका आणि किती असेल गर्दी? आयोगने दिले 'हे' उत्तर)

दरम्यान, बिहार मध्ये 243 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूका होणार आहेत. या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजेच 28 ऑक्टोंबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर रोडी पार पडणार आहेत. तर निवडणूकीचे निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.

IANS सी वोटर बिहार ओपिनियन पोल सर्वेनुसार, बिहारमध्ये एनडीए पुन्हा येऊ शकते. तसेच एनडीए बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी 151 जागांवर विजय मिळवू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर युपीएला 74 जागा मिळण्याचीी शक्यता आणि अन्य जणांना 18 जागा मिळतील.