Bihar News: मुझफ्फरपूरमध्ये पोलिसांच्या छापेमारीत तरूणाचा मृत्यू, संतप्त जमावाने पोलिस ठाण्याला लावली आग
बिहारमधील मुझफ्फरपूर मध्ये संतप्त जमावाने एका पोलीस ठाण्याला आग लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Bihar News: बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूर मध्ये संतप्त जमावाने एका पोलीस ठाण्याला आग लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. शहरात पोलिसांनी दारूसाठी छापा टाकला होता. दरम्यान ही माहिती कळताच घटनास्थळावरील लोकांना गोंधळ घालून घटनास्थळावरून पळ काढला. तर घटने दरम्यायान एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जमावाने संताप व्यक्त केला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांना पाहून लोकांनी आरडाओरड करत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान एक तरूण मुलगा देखील यात सामील होता. पळता पळता मुलगा एका खड्ड्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जमावाला समजताच, त्यांनी पोलिसांवर आक्रमकता दाखवली. संतप्त जमावाने पोलीस ठाणे पेटवून दिले. जमावांनी मुलाचा मृतदेह पोलिस ठाण्यात नेऊन मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवला. आणि पोलिस ठाण्याला आग लावली. जमावाने पोलिस ठाण्याच्या बाहेर उभे राहून वाहनांचीही जाळपोळ केली.
मिळालेल्या माहितीनुसार गावात अवैद्य दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान ही दुर्घटना घडली आणि पोलिस ठाणे जाळून टाकलं. पाण्याने भरलेल्या खड्डात पडून मुलाचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या काही वेळानंतर आग आटोक्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात बंदोबस्त तैनात केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

