Bestiality Horror in Jharkhand: झारखंडमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना! बांग्लादेशी व्यक्तीने वासराशी केला अनैसर्गिक संभोग, गुन्हा दाखल

वासराचे मालक, श्याम बहादुर प्रसाद यांनी रविवारी त्यांच्या गोठ्यातील सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.

Calf (Representational Image; Photo Credit: Pixabay)

Bestiality Horror in Jharkhand: झारखंडमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शनिवारी बागबेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाघिडीह येथे एका वासराशी अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural Sex) ठेवल्याने अधिकाऱ्यांनी रविवारी एका बांगलादेशी पुरुषाविरुद्ध एफआयआर दाखल केला. झारखंडमधील जमशेदपूर शहरात ही घटना घडली आहे. वासराचे मालक, श्याम बहादुर प्रसाद यांनी रविवारी त्यांच्या गोठ्यातील सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.

आरोपीने शनिवारी रात्री आठच्या सुमारास हा घृणास्पद गुन्हा केला. रविवारी सकाळी बछड्याच्या मालकाने तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिल्याचा दावा केला. सैदुल शेख असे 33 वर्षीय आरोपीचे नाव असून तो सध्या बेपत्ता आहे. बागबेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी के के झा यांनी TOI ला सांगितले की, आरोपी त्याच्या गैरवर्तनाच्या अफवांमुळे पळून गेला असावा. (हेही वाचा - Surat Shocker: प्रेयसीच्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार, चाईल्डलाईन सेवकांच्या मदतीने आरोपीला अटक)

झा यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी रोजंदारीवर काम करत होता. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी बांगलादेशचा नागरिक असून पोलिसांनी त्याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे, असे माई दरबारचे अध्यक्ष संदीप सिंग यांनी सांगितले आहे.

ही बातमी प्रसारित होताच हिंदू संघटनेचे नेते पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी संशयिताच्या अटकेची मागणी केली. भाजप किसान मोर्चा जिल्हा समितीचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांनी आरोपीला 24 तासांत अटक करण्याची विनंती केली आहे.