Bengaluru Shocker: सिगारेटची अॅश फेकण्यासाठी बाल्कनीत आलेल्या तरुणाचा 33व्या मजल्यावरून पडून मृत्यू, बेंगळूरूतील घटना
सगळीकडे नव्या वर्षाच्या जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Bengaluru Shocker: सगळीकडे 31 डिसेंबरची पार्टीची तयारी जोरदार सुरु आहे. सगळीकडे नव्या वर्षाच्या जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बंगळूरूमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पार्टीत 27 वर्षीय अभियंता मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. रात्री उशीरापर्यंत सेलिब्रेशन करत असताना तो बाल्कनीतून खाली कोसळला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिलेब्रेशन करत असताना, सिगारेटची अॅश बाहेर फेकण्यासाठी आला. बाल्कनिक बाहेर आला. आणि तोल गेला आणि थेट 33व्या मजल्यावरून खाली पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळूरूतील पश्चिम भागात ही घटना घडली आहे. दिव्यांशू शर्मा असं मृत तरुणाचे नाव होते. मध्यरात्री पार्टीत असताना, दिव्यांशू बाल्कनीत आला आणि सिगारेटची अॅश फेकण्यासाठी बाहेर आला तेव्हा तो झोपत होता. यावेळीच तो अपार्टमेंटमध्ये वॉकिंग ट्रॅकवर कोसळला अशी माहिती देण्यात आली. हॅगओव्हरमुळे त्याचा तोल गेला असं पोलिसांनी प्राथमिक अंदाज लावला. (हेही वाचा- क्रिकेट खेळल्यानंतर पाणी प्यायल्याने 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय
रहिवासांनी दिव्यांशुचा मृतदेह पाहिल्यानंतर व्हॅटअॅपवर या घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच मित्रांनी खाली धाव घेतली आणि त्याचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात नेला. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेसंदर्भात तपासणी सुरु केली आहे.पोलिसांना बाल्कनीच्या मजल्यावर, रेलिंगजवळ सिगारेटची राख सापडली. राखेवर बुटाच्या खुणा दिसल्याचे सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.