Bengaluru Accident : ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, व्होल्वो बसची वाहनांना उडवले, अपघात कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे चार ते पाच वाहनांना धडक बसली. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

Photo Credit- X

Bengaluru Accident : व्होल्वो बसचे (Volvo Bus Accident )ब्रेक फेल झाल्यामुळे चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना बंगळुरुमध्ये घडली. धक्कादयक म्हणजे फ्लाय-ओव्हरवर (Flyover) हा भीषण अपघात झाला. अपघाताची दृश्ये समोर आली आहेत. सोमवारी सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. अन्यथा बसच्या धडकेत छोटी वाहने फ्लाय-ओव्हरवरून खाली पडण्याची शक्यता होती. बसने दुचाकी आणि चारचाकींना धडक दिली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (हेही वाचा: Viral Video: पर्यटकाने सफारी गाडीच्या आतून हात काढला आणि सिंहाला स्पर्श करू लागला, मग पुढे काय झाले.पाहून थक्क व्हाल)

बंगळुरुमधील हेब्बल फ्लायओव्हरवर बीएमटीसीच्या व्होल्वो बसने अनेक गाड्यांना टक्कर दिली. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे व्होल्वोवरील नियंत्रण सुटले होते. व्हिडीओत दिसत असलेल्या दृश्यांनुसार, या अपघातामध्ये व्होल्वो बस दुचाकी आणि कारला धडकल्याचे दिसत आहे. अपघाताचा सर्व थरार व्होल्वो बसमध्ये लावणयात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पोस्ट व्हिडीओ

व्हिडीओमध्ये व्होल्वो बस चालक ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो, पण ब्रेक लागत नाही. त्यानंतर बसने प्रथम दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर पुढे जात इतर अनेक वाहनांना धडक दिसली.व्होल्वो बसच्या वाटेत एक कार आल्यावरच बस थांबली. अपघातात एका दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.