Belgavi Shocker: बेळगावी येथील शालेय पोषण आहारात निष्काळजीपणा! दुधात सापडलं 'असं काही', 23 विद्यार्थी पडले आजारी

पाल पडलेलं दूध पिल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघजकीस आली आहे.

Milk And Poison

Belgavi Shocker: बिहार मध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी वसतिगृहात भात अर्धवट शिजवलेला 30 विद्यार्थींनी आजारी पडल्या होत्या ही घटना ताजी असताना, पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघजकीस आली आहे. ही घटना कर्नाटकातील बेळगावी येथील एका शाळेत घडला आहे. शालेय पोषण आहार हा शालेय विभागाकडून दिला जातो. त्यांच्या निष्काळजीपणामुळे मुले आजारी पडली आहे. विषबाधा झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. (हेही वाचा- वसतिगृहात निष्काजीपणा! अर्धवट शिजवलेला भात खाल्ल्याने 30 विद्यार्थीनी आजारी, बिहारमधील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेळगावी येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी सकाळी मृत पाल पडलेल दुध प्यायल्याची घटना समोर आली आहे. या गंभीर समस्येमुळे 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलांना उलट्या सुरु झाल्या. विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर संपुर्ण गावात मोठी खळबळ उडाली आहे. पालकांनी या प्रकरणी शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी शिक्षक विभागाकडून चौकशी सुरु केली आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच, हुक्केरी गटशिक्षण अधिकारी (BEO) प्रभावती पाटील यांनी शाळेला भेट दिली. शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सर्व दुध पिणाऱ्या विद्यार्थ्यांना संकेश्वर रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मुलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं मुळ कारण सांगितलं नाही. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. कोणाच्या निषकाळजीपणाने हा प्रकार घटला आहे याचा शोध सुरु आहे.