Wah Re Kisan Campaign: BASF द्वारे ‘वाह रे किसान' मोहिम सुरू; सर्वश्रेष्ठ काम करणार्‍या 5 असामान्य शेतकर्‍यांचा करण्यात येणार गौरव

या मोहिमेअंतर्गत आसपासचा समाज व भारतातील कृषिक्षेत्रात परिवर्तन घडविणार्‍या 5 शेतकर्‍यांवर प्रकाश टाकला जाणार आहे. हा कार्यक्रम बीएएसएफच्या खास यूट्यूब आणि फेसबूक चॅनल्सवर प्रसारण करण्यात येणार आहे.

Wah Re Kisan Campaign (फोटो सौजन्य - File Image)

Wah Re Kisan Campaign: बीएएसएफने (BASF) 'वाह रे किसान' मोहीम (Wah Re Kisan Campaign) सुरू केली केली आहे. ही मोहीम 'बिगेस्ट जॉब ऑन अर्थ' मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेअंतर्गत आसपासचा समाज व भारतातील कृषिक्षेत्रात परिवर्तन घडविणार्‍या 5 शेतकर्‍यांवर प्रकाश टाकला जाणार आहे. बीएएसएफने श्री. अन्‍नू कपूर यांची या मोहीमेचे संयोजन करण्यासाठी नेमणूक केली. हा कार्यक्रम बीएएसएफच्या खास यूट्यूब आणि फेसबूक चॅनल्सवर प्रसारण करण्यात येणार आहे. या मालिकांचे प्रसारण सुरू करण्यापूर्वी सुमारे महिनाभर सामाजिक प्रसार माध्यमांवर महिनाभर मोहीम राबविण्यात आली, ज्याद्वारे त्यांच्या कहाण्या सादर करण्यास सांगण्यात आले ज्यातून शेवटी ‘वाह रे किसान' मोहीमेसाठी 5 सर्वाधिक प्रेरणादायी कहाण्या सादर करणार्‍या शेतकर्‍यांची निवड करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत सर्वश्रेष्ठ काम करणारे शेतकरी प्रकाशझोतात येणार आहेत. बीएएसएफचे अधिकारी लिविओ टेडेस यांनी सांगितलं की, भारतातील वैविध्यपूर्ण भौगोलिक आणि कृषि पद्धतींच्या पार्श्वभूमीवरील 5 नाविन्यपूर्ण शेतकर्‍यांची भेट घेताना मला अतिशय आनंद झाला, ज्यांचा 'वाह रे किसान' मध्ये समावेश करण्यात आला आहे. आपण शाश्वत भविष्याच्या दिशेने त्यांच्यासोबत काम करत असताना इतरही अनेक शेतकरी त्यांचे अनुकरण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेतील अशी मला अपेक्षा आहे. (हेही वाचा - Farmers Day: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याच्या स्मरणार्थ, राज्यात 19 ऑगस्ट 2024 दिवशी साजरा होणार 'शेतकरी दिन')

• मालिका एक: उर्जेच्या बाबतीत कार्यक्षम व कमी खर्चाचा सौर ड्रायरचा शोध ज्यामुळे शेतकर्‍यांना कापणीनंतर होणारे पिकाचे नुकसान कमी करण्यास मदत होईल. [श्री. तुषार गावरे, महाराष्ट]

• मालिका दोन: एका अशा शेतकर्‍यांची गोष्ट ज्याने केवळ त्याच्या शेतजमिनीचे परिवर्तन केले नाही तर नाविन्यपूर्ण पद्धतींसह संघटित शेती सादर करून संपूर्ण गावात परिवर्तन केले. [श्री. मंजन्‍ना टी. के., कर्नाटक]

• मालिका तीन: भाताची लायब्ररी जिने भारतातील स्थानिक विविध प्रकारांचे जतन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. [श्री. महान चंद्र बोरा, आसाम]

• मालिका चार: पारंपारिक पिक पद्धतीला तोंड द्याव्या लागणारा पाण्याचा तुटवडा हाताळण्यासाठी वैविध्यपूर्ण कृषि पद्धतीची कशी मदत होते. [श्री. सरवण सिंग चंदी, पंजाब]

• मालिका पाच: सफरचंदाच्या लो चिलिंग प्रकाराद्वारे पारंपारिक कृषि पद्धतीत परिवर्तन. [श्री. हरिमण शर्मन, हिमाचल प्रदेश

आम्हाला 'वाह रे किसान' ही मोहीम सुरू करताना आणि संपूर्ण भारतातील शेतकर्‍यांच्या लक्षणीय यशाचा सोहळा साजरा करताना अतिशय आनंद होत आहे, असं गिरिधर बीएएसएफचे बिझनेस डायरेक्टर रानुवा यांनी म्हटलं आहे. आता पर्यंत '‘वाह रे किसान' ही मोहीम सोशल मिडियावर 35 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली आहे, आणि शेतकर्‍यांना तोंड द्याव्या लागणार्‍या समस्या निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. इन्फो-टेनमेन्ट मालिकेच्या सहाय्याने, आपल्या शेतकर्‍यांच्या अतिशय सृजनशील प्रयत्‍नांची चर्चा सर्वत्र होणे गरज आहे कारण इकडे शहरात राहणारे आपण ह्या सर्व गोष्टी गृहित धरतो. कारण, आपले अन्‍न कसे तयार होते त्यात आपला काहीही सहभाग नसतो, असंही रानुवा यांनी म्हटलं. (हेही वाचा - Waqf Board Notices to Latur Farmers: लातूरमध्ये शेतजमीन कोणाची? शेतकरी की वक्फ बोर्ड? भाजपची चौकशीची मगणी, काय आहे प्रकरण?)

ह्या पाच शेतकर्‍यांच्या गोष्टींचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध फिल्म व टेलेव्हिजन कलाकार, श्री. अन्‍नू कपूर यांनी केले असून ते BASF Agro India - YouTube 2025 येथे उपलब्ध आहे. आगामी महिन्यांमध्ये, ‘वाह रे किसान' च्या दुसर्‍या भागात नवीन शेतकर्‍यांच्या वेगळ्या कहाण्या प्रदर्शित करण्याची बीएएसएफची योजना आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now