Bangladesh Train accident: बांगलादेशात मोठी दुर्घटना, दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या, अपघातात 17 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

bangladesh train accident

Bangladesh Train accident: बांगलादेश मध्ये दोन ट्रेनच्या टक्करेत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सोमवारी बांगलादेशची राजधानी ढाका जवळ हा अपघात झाला आहे. या घटनेनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुपारच्या वेळी ही घटना घडली आहे. किशोरगंजमधील भैरब येथे मालगाडीटी पॅसेंजर ट्रेनला धडक बसून हा अपघात झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, अडकलेले प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. अनेक लोक ट्रेनखाली अडकले होते तर अनेक जखमी प्रवाशी डब्याखाली चिरडले होते. अपघातात मृत्यूची संख्या वाढू शक्यते अशी भीती वर्तवली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे.  पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मदतकार्य सुरु झाले. पोलिस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार,मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

प्राथमिक अहवालानुसार मालगाडी एगारो सिंदूरला मागून धडकली, त्यामुळे दोन डबे एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं सांगितले जात आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif