Niti Aayog CEO: B V R Subrahmanyam होणार NITI आयोगाचे नवे सीईओ; परमेश्वरन अय्यर यांना जागतिक बँकेत मिळाली 'ही' मोठी जबाबदारी
अय्यर यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Niti Aayog CEO: माजी IAS अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम (B V R Subrahmanyam) यांची सोमवारी NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुब्रह्मण्यम हे NITI आयोगामध्ये परमेश्वरन अय्यर (Parameswaran Iyer) यांची जागा घेतील. अय्यर यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुब्रह्मण्यम यांच्या नियुक्तीला पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे.
कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुब्रह्मण्यम यांच्या नियुक्तीला त्यांच्या पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे. NITI आयोगाचे CEO म्हणून कार्यरत असलेले परमेश्वरन अय्यर यांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी जागतिक बँकेच्या मुख्यालयाचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा -Passport Fake Websites: पासपोर्ट बनवण्याचा खोटा दावा करतात 'या' वेबसाईट; सरकारने दिला इशारा, जारी केली बनावट वेबसाईटची यादी)
कोण आहेत बीव्हीआर सुब्रमण्यम?
सुब्रमण्यम हे 1987 च्या बॅचचे छत्तीसगड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची मे 2021 मध्ये वाणिज्य सचिव म्हणून नियुक्ती झाली. 30 सप्टेंबर 2022 रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. 2019 मध्ये विभाजन होण्यापूर्वी ते जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी नोकरशहा म्हणून व्यापक काम केले आहे.