Ayodhya Land Dispute Case: अयोध्या प्रकरणी उद्याच्या निकालापूर्वी आज दिवसभरात काय घडलं?

निकालाच्या पार्श्वभूमिवर आज काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या.

Visual from the Ram Janmabhoomi Nyas-run workshop | (Photo Credits: PTI)

Ayodhya Land Dispute Case: गेली अनेक दशकं भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात अत्यंत संवेदनशील राहिलेल्या अयोध्या जमीन वाद (Ayodhya Land Dispute) प्रकरणाचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) उद्या (9 नोव्हेंबर 2019) देत आहे. हे प्रकरण अत्यंत अत्यंत संवेदनशील असल्याने सर्वच्च न्यायालय, केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि केंद्रीय संरक्षण यंत्रणेसोबतच राज्याराज्यांतील पोलीस दल सुरक्षेसाठी सज्ज झाले आहे. निकालाच्या पार्श्वभूमिवर आज काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. मध्य प्रदेश राज्यातील अयोध्या शहराला तर अक्षरशाहा छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मध्य प्रदेशमधील 20 पेक्षाही अधिक जिल्हे हे अतिसंवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. दोन हेलिकॉप्टर्सद्वारे आकाशातूनही संवेदनशील परिसरावर नजर ठेवली जाणार आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमिवर आज काय घडलं?

काय आहे प्रकरण?

६ डिसेंबर १९९२मध्ये आयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर या प्रकरणा दिवानी आणि फौजदारी न्यायालयात अनेक खटले दाखल झाले. त्यातील भूहक्काबाबतचा वाद तर, न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१०ला या वादप्रकरणात निर्णय दिला होता. यात तीनही पक्षकारांना वादग्रस्त जमीनीचे वाटप समान विभागून देण्यात यावेत असा निर्णय देण्यात आला होता. मात्र, यावर समाधान न झाल्याने ९ मे २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली. सध्या हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याचाच निकाल उद्या म्हणजेच शनिवार 8 नोव्हेंबर या दिवशी दिला जाणार आहे.