Gulmarg Avalanche: काश्मीरमधील गुलमर्गमध्ये हिमस्खलन, एका पर्यटकाचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती
गुलमर्गमधील अफारवत शिखराच्या खिलन रोडवर गुरुवारी हा अपघात झाला.
Gulmarg Avalanche: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील गुलमर्ग (Gulmarg) येथे भीषण हिमस्खलन (Avalanche) झाले आहे. या हिमस्खलनात तीन परदेशी पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हिमस्खलनात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. गुलमर्गमधील अफारवत शिखराच्या खिलन रोडवर गुरुवारी हा अपघात झाला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर एकजण बेपत्ता आहे. हा अपघात आज दुपारी दोनच्या सुमारास घडला. या हिमस्खलनात किमान पाच विदेशी पर्यटक अडकल्याचं सांगण्यात येत आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू करण्यात आली. बर्फाखाली अडकलेल्या किमान एका स्कीयरला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. हे सर्व पर्यटक परदेशी असल्याचे समजते. (हेही वाचा - Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू)
पहा व्हिडिओ -
श्रीनगरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे हिमस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडेच, जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग भागात हिमस्खलनाने सिंध नदी अडवली, त्यामुळे जलाशयाचा मार्ग बदलला आणि रस्त्यावर पाणी येऊ लागले. त्यामुळे नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.