Assembly Elections 2024 Results On Aaj Tak: हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार? येथे पाहा मतमोजणीचे थेट निकाल
कोणत्या पक्षाला विजय मिळतो आणि कोणाची निराशा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे निकाल या दोन राज्यांची राजकीय दिशा तर ठरवतीलच, पण सरकार स्थापन करण्यात कोणता पक्ष यशस्वी होईल हेही सांगतील. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. हरियाणात भाजप पुन्हा एकदा विजयी होणार की काँग्रेस आपली गमावलेली जागा परत मिळवण्यात यशस्वी होणार?
Assembly Elections 2024 Results On Aaj Tak: आज, 8 ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. कोणत्या पक्षाला विजय मिळतो आणि कोणाची निराशा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे निकाल या दोन राज्यांची राजकीय दिशा तर ठरवतीलच, पण सरकार स्थापन करण्यात कोणता पक्ष यशस्वी होईल हेही सांगतील. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. हरियाणात भाजप पुन्हा एकदा विजयी होणार की काँग्रेस आपली गमावलेली जागा परत मिळवण्यात यशस्वी होणार? त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या दोन्ही राज्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. निवडणुकाच्या निकाला प्रसंगी आज तक आपल्या यूट्यूब चॅनलवर हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकांचे निकाल थेट प्रक्षेपित करत आहे. यासोबतच तुम्ही Marathi.latestly.com वर निवडणूक संबंधित सर्व बातम्या आणि विश्लेषण देखील वाचू शकता. हे देखील वाचा: Assembly Election Results 2024 On Tv9 Marathi: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार; जनता कोणाला देणार कौल? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार? लाइव्ह
हरियाणात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस पुनरागमन करेल अशी आशा आहे. यावेळी विधानसभेच्या 90 जागांवर एकूण 1,031 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. आज होणाऱ्या निकालावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.
जम्मू-काश्मीरबद्दल बोलायचे झाले तर येथे जवळपास 10 वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. अशा स्थितीत येथील राजकीय चित्र खूपच रंजक बनले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबर आणि शेवटचा टप्पा 1 ऑक्टोबरला पार पडला.