Congress Party ही पाकिटचोर, Asaduddin Owaisi यांची Rahul Gandhi यांच्यावर टीका
कॉंग्रेस पक्ष हा पाकिटचोरांची जमात असल्याची टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी(Asaduddin Owaisi) यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यावर केली.
कॉंग्रेस पक्ष हा पाकिटचोरांची जमात असल्याची टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी(Asaduddin Owaisi) यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यावर केली. तसेच राहुल गांधी यांचे नाव उघडपणे न घेता औवेसी यांनी हा हल्लाबोल केला आहे.
मलकपेटच्या सईदाबाद येथे प्रचारासाठी गेलेले औवेसी यांनी कॉंग्रेस पक्ष(Congress Party) आणि तेलगु देसम पक्षावरही हल्लाबोल केला आहे. चंद्रबाबू नायडू यांच्यामुळे अनेकांचे जीवन उद्धस्त झाले. तर आमच्या तरुणांना तुरुंगात ठेवण्यात येत होते. त्यावेळी कॉंग्रेस कुठे होती असा सवाल औवेसी यांनी या प्रचारदौऱ्यावेळी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांचे आयुष्य ऐशोआरामीचे जगले असून उलट आम्ही लाठ्या खाल्ल्या असल्याचे औवेसी यांनी म्हटले आहे. देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून सर्व त्रास आम्ही सहन केला असल्याची टीका यावेळी केली आहे.
कॉंग्रेस आणि तेलगु देसम पार्टी ही पाकिटमारांची जमात आहे. तर कोणताच राजकीय पक्ष आम्हाला यशाच्या वाटेवर अडवू शकत नाही. तर आमचा पक्ष वाढत असल्याने कॉंग्रेस, भाजप आणि तेलगु समाजाच्या डोळ्यात खुपत असल्याची जोरदार टीका केली आहे. मात्र हे सर्व पक्ष जनतेची दिशाभूल करत असल्याचा प्रयत्न करत असल्याचे ही औवेसी यांनी विधान केले आहे.