विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शक्यता संपुष्टात; भौतिकशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक निरुपम रॉय यांनी सांगितले महत्त्वाचे कारण

परंतु, इस्त्रोच्या या प्रयत्नांमध्ये आणखी एका अडचणीची भर पडणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होते, तिथे येत्या शुक्रवारपासून अंधार होण्यास (Lunar Night Falls) सुरुवात होणार आहे.

Vikram Lander (Photo Credits: ISRO)

चद्रयान 2 ( Chandrayaan-2) या मोहिमेतील विक्रम लँडरशी (Vikram Lander) संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्त्रोच्या (ISRO) मुख्यलयातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परंतु, इस्त्रोच्या या प्रयत्नांमध्ये आणखी एका अडचणीची भर पडणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होते, तिथे येत्या शुक्रवारपासून अंधार होण्यास (Lunar Night Falls) सुरुवात होणार आहे. यामुळे विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होणे जवळपास कठीण जाणार आहे, अशी माहिती भौतिक शास्त्र विषयातील सहायक प्राध्यापक  निरुपम रॉय  (Vikram Lander) यांनी दिली आहे. तसेच विक्रम लँडरचे नक्की काय झाले? हे संपर्क तुटल्यामुळे अद्यार इस्त्रोला समजू शकलेले नाही. मात्र, अजूनही विक्रम लँडरशी संपर्क होईल, अशी इस्त्रोकडून शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्यातील सोलर पॅनेल योग्यरित्या काम करेल, असे अपेक्षित होते. परंतु विक्रम लँडरशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. महत्वाचे म्हणजे, विक्रम लँडरची निर्मिती करताना उणे 180 डिग्री सेल्सियस तापमान काम करू शकेल, या पद्धतीने तयार करण्यात आले नव्हते. त्याचबरोबर चंद्रावर अंधार सुरू झाल्यामुळे विक्रम लँडर कार्यरत होणे, अवघड असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला विक्रम लँडर चंद्रावर उतरणार होता. पण चद्रापासून क्वचितच दूर असताना विक्रम लँडर आणि बंगळरु येथील इस्त्रो मुख्यालय यांच्यातील संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्त्रोतील शास्त्रज्ञ विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत आहेत. हे देखील वाचा- Chandryaan 2: नागपूर पोलिसांची विक्रम लॅन्डर कडे विनवणी, सिग्नल तोडण्यासाठी चलान घेणार नाही म्हणत केले हटके ट्विट

बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधील भौतिक शास्त्र (Physics) विषयातील सहायक प्राध्यापक निरूपम रॉय म्हणाले, आपण आता म्हणू शकतो की विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. विक्रम लँडरवरील रोव्हरचे आयुष्य संपुष्टात आले आहे. लुनार डे मध्ये प्रयोग करण्यासाठी विक्रम लँडर पाठविण्यात आले होते. लुनार नाईटमध्ये काम करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली नव्हती.