Kashmir: क्रिकेट खेळताना वाद, तरुणावर बॅटने प्राणघातक हल्ला, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
काश्मीर येथील नौगामच्या मदंखा परिसरात स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. वादानंतर क्रिकेटच्या तरुणाला बॅटने मारहाण केले. या मारहाणीत तरुणांचा जागीच मृत्यू झाला असा दावा करणारा पोस्ट व्हायरल होत आहे
Kashmir: काश्मीर येथील नौगामच्या मदंखा परिसरात स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून वाद झाला. भांडणानंतर क्रिकेटच्या बॅटने तरुणाला मारहाण केले. या मारहाणीत तरुणांचा जागीच मृत्यू झाला असा दावा करणारा पोस्ट व्हायरल होत आहे. या घटनेमुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा-कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगडमध्ये स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, मॉर्फ केलेला फोटो दाखवून केले ब्लॅकमेल....)
मिळलेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत क्रिकेट खेळणे एका तरुणाच्या जीवाशी बेतले आहे. क्रिकेट सामन्यात झालेल्या वादात तरुणाला बॅटने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाने आपला जीव गमावला आहे असा एक पोस्ट सद्या व्हायरल होत आहे. श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आणि दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
क्रिकेट खेळताना मारमारी
पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, पीडित जीवंत आहे. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. तरुणांने मित्राला का मारले हे अद्याप समजू शकले नाही. याचा पुढील तपास सुरु झाला आहे.