Chandigarh Rape Case: कोलकाता येथील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात निदर्शने सुरू आहेत. यासोबतच बदलापूरमध्येही मुलींच्या लैंगिक शोषणाची घटना नुकतीच घडली. अशा परिस्थितीत चंदीगडमधील एका शाळेत विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. विद्यार्थिनी एका शाळेत बारावीत शिकते. शाळेच्या बस चालकानेच विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद रज्जाक याला अटक केली आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, आरोपी तिला अनेक दिवसांपासून त्याचा मॉर्फ केलेला फोटो दाखवून ब्लॅकमेल करत होता. तसेच आरोपीने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. अखेर घाबरलेल्या विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. हे देखील वाचा: Man Abuse Minor Girl in Thane: अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात दाखवला अश्लिल व्हिडिओ, पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल
कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींवर पॉक्सो अंतर्गत कारवाई केली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या काही दिवसांपासून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता, यादरम्यान आरोपीने तिचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
मे महिन्यात आरोपी पहिल्यांदा विद्यार्थिनीच्या घरात कोणी नसताना घुसला आणि तिला सांगितले की, 'जर त्यांचे संबंध नसतील तर तो हा फोटो व्हायरल करेल', त्यानंतर आरोपी जुलैमध्ये पीडितेच्या घरी गेला. तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.