कृषी कायदे मागे घेतल्याने संतापली कंगना, पोस्ट शेअर करुन दिला प्रतिक्रिया 

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून कंगना रणौतने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे असे म्हटले आहे.

कंगना रनौत (Photo Credits-Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (19 नोव्हेंबर) कृषी कायद्या (Farm Law) विरुद्ध आंदोलन करणार्‍या आंदोलकांना दिलासादायक बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार 3 सुधारित कृषी कायदे मागे घेत असल्याची तसेच राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी बांधवांनी मागे फिरण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान मोदींच्या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. पण पंगा गर्ल कंगना रणौत मोदी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

पोस्ट शेअर करत दिली कंगणाने प्रतिक्रिया 

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून कंगना रणौतने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे असे म्हटले आहे. तसेच संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन, असे कंगनाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. कंगनाने याआधी सरकारच्या कायदे आणण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. (हे ही वाचा Farm Laws to be Repealed: 3 केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधनांची घोषणा; पहा Raju Shetti ते Nawab Malik यांची प्रतिक्रिया.)

Kangana Post (Photo Credit - Instagram)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांना पटवून देऊ शकलो नाही, आमची तपश्चर्या कमी होती, त्यामुळे आम्हाला हा कायदा मागे घ्यावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले पण शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कायदा मागे घेत नवीन सुरवात करुया मोदी असे म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif