Andhra Pradesh: तीर्थयात्रेवरून परतताना भीषण रस्ता अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, 11 जण जखमी
तर आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, छोट्या व्हॅनमध्ये किमान 38 लोक होते, जे तीर्थयात्रा करून श्रीशैलमला परतत होते.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथे सोमवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात (Horrific Road Accident) सात जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील रेंटाचिंतला येथे हा अपघात झाला. पोलीस सूत्रांनी सांगितले की, क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणारी व्हॅन रेंटचिंतला येथील पॉवर स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, छोट्या व्हॅनमध्ये किमान 38 लोक होते, जे तीर्थयात्रा करून श्रीशैलमला परतत होते.
Tweet
एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवर सांगितले, “आम्ही अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चांगल्या उपचारासाठी गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Jammu-Kashmir: पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार, दोन एके रायफल जप्त)
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत अशी विनंती केली.