Andhra Pradesh Factory Fire Breaks: आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू, 33 जखमी

अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजया कृष्णन यांनी सांगितले की, एसेन्शिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांटमध्ये दुपारी २.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.

Fire Breaks | (Photo Credit: X)

Andhra Pradesh Factory Fire Breaks: आंध्र प्रदेशातील अच्युथापुरम येथे बुधवारी एका फार्मास्युटिकल कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजया कृष्णन यांनी सांगितले की, एसेन्शिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांटमध्ये दुपारी २.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. हे देखील वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदे याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड, कुटुंबीयांनाही मारहाण; आरोपीच्या आईवडिलांचा दावा

कृष्णन यांनी पीटीआयला सांगितले, “कारखान्यात ३८१ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. दुपारी जेवणाच्या सुट्टीत हा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. दरम्यान, घटनेचा संपूर्ण तपास सध्या सुरु आहे.