Case Against Anand Mahindra: अपघातादरम्यान स्कॉर्पिओमधील एअरबॅग न उघडल्याने गेला मुलाचा जीव, आनंद महिंद्रासह 13 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा मित्रांसोबत लखनौहून कानपूरला येत होता. दाट धुक्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली, त्यामुळे अपूर्वाचा जागीच मृत्यू झाला.
Case Against Anand Mahindra: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (kanpur) येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यासह 13 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्तीने आरोप केला आहे की, कंपनीने एअरबॅगशिवाय कार विकली, ज्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. जुही, कानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश मिश्रा यांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सांगितले की, 2020 मध्ये त्यांनी जरीब चौकी येथील श्री तिरुपती ऑटो एजन्सीकडून 17 लाख रुपयांची स्कॉर्पिओ कार खरेदी केली होती. 14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा मित्रांसोबत लखनौहून कानपूरला येत होता. दाट धुक्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली, त्यामुळे अपूर्वाचा जागीच मृत्यू झाला.
त्यांनी सांगितले की, घटनेनंतर त्यांनी एजन्सीमध्ये जाऊन लोकांना याबाबत माहिती दिली. सीट बेल्ट घातला असूनही कारच्या एअरबॅग उघडल्या नाहीत. ज्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या एजन्सीच्या व्यवस्थापकाने राजेशला कंपनीच्या संचालकांशी बोलायला लावले. (हेही वाचा - Insurance Policy Scam: विमा पॉलिसी घोटाळ्यात आयटी कंपनीची 40 लाखांची फसवणूक; संचालकाला अटक)
राजेश मिश्रा यांनी संभाषणादरम्यान एजन्सीचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. राजेशचा आरोप आहे की, त्यांनी कारची तांत्रिक तपासणी केली, ज्यामध्ये त्यांना कारमध्ये एअरबॅग नसल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी राजेशने रायपुरवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र त्याची कोणतीही सुनावणी झाली नाही. त्यानंतर राजेशने कोर्टात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानंतर एजन्सीचे व्यवस्थापक चंद्र प्रकाश गुरनानी, विक्रम सिंग मेहता, राजेश गणेश जेजुरीकर, अनीस दिलीप शाह, थोथला नारायणसामी, हरग्रेव खेतान, मुथय्या मुरगप्पन मुथय्या आणि आनंद गोपाल महिंद्रा यांच्यासह 13 जणांविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमे नोंदवण्यात आली. यासंदर्भात रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
रायपुरवा पोलिस स्टेशनचे प्रभारी अमन सिंग यांनी सांगितले की, महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.