Gopalganj: UPSC परिक्षेसाठी बेरोजगार तरुणाचा प्रताप, अल्पवयीन मुलाचे राहत्या घरातून केलं अपहरण
मुलाला त्याच्या राहत्या घरातून आरोपीने पळवले होते. ४८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाची सुटका करण्यात आली आहे.
Gopalganj: बिहार येथे आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping) केल्याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आला आहे. मुलाला त्याच्या राहत्या घरातून आरोपीने पळवले होते. 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- विवाहित प्रेयसीच्या घरात प्रियकराला पकडले रंगेहाथ, लोकांनी केली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सांयकाळी आरोपीने मुलाला त्याच्या राहत्या घरातून अपहरण केले. अमित कुमार असं आरोपीचे नाव आहे. अपहरणांनंतर पीडितेच्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून परिसरात आणि शहरात मुलाचा शोध घेतला. अखेर पोलिसांना अपहरणाचा छडा लावण्यात यश आला. 48 तासांनंतर पीडित मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
आर्थिक जुळवाजुळव
पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीतून असं समोर आले की, आरोपीने पैशांसाठी मुलाचे अपहरण केले. आरोपी बेरोजगार आहे. त्याला UPSC परिक्षेसाठी निधी भरायचा होता. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती, म्हणून त्यांने मुलाचे अपहरण केले असे चौकशीतून उघडकीस आले.
घरात घुसून केलं अपहरण
गुरुवारी सांयकाळी गोपालगंज जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत होता. पावसापासून बचावकरण्यासाठी तो माजिरवान कलान गावात घुसला. तेथे त्याने वेळाचा फायदा घेत घरात घुसला. पीडितेच्या आईने त्याला थोडावेळ आश्रयासाठी दिला. पीडित मुलाची आई किचनमध्ये जाता आरोपी मुलाला घेऊन फरार झाला. घाबरलेल्या आईने तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली.