ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्यांच्या शेजारच्या 11 वर्षीय मुलाच्या आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने बुधवारी प्रथमदर्शनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, मुलाने 11 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास (Hanging) लावून मरण पावले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी त्यानुसार अपघाती मृत्यू (एडी) गुन्हा दाखल केला. मृत्यूमागचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. हेही वाचा Crime: नात्याला काळीमा फासणारे कृत्य, अवघ्या एक हजारांसाठी मोठ्या भावाची केली हत्या, आरोपी अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणार्या दोन महिलांनी या मुलावर अत्याचार. आणि मानसिक छळ केला आणि त्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही महिलांवर कलम 305 (मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.