मुंबई शेअर बाजार मध्ये मोडी पडझड, सेन्सेक्स 2400 पेक्षा अधिक अंकांनी घसरले तर निफ्टी 10,000 पेक्षा खाली

त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वीच सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सुमारे 2600 पेक्षा अधिक अंकांनी गडगडल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

Sensex falls due to outbreak of coronavirus (Photo Credits: ANI/IANS)

मुंबई शेअर बाजार आज उघडताच 1200 पेक्षा अधिक अंकांनी घसरल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वीच सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सुमारे 2600 पेक्षा अधिक अंकांनी गडगडल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. तर आज सकाळी निफ्टी 10,000च्या देखील खाली आली होती. दरम्यान सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. त्यासोबत रशिया आणि सौदी अरेबियामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीवरून दरयुद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजार सोबतच जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसल्याचं चित्र आहे. भारतीय वेळेनुसार आज सकाळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी 13 मार्चपासून पुढील 30 दिवसांसाठी युरोपातून येणार्‍या प्रवाशांना बंदी असल्याचं जाहीर केले आहे. दरम्यान काल WHOने कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संकट जाहीर केल्यानंतर भारतामध्येही 15 एप्रिल पर्यंत पर्यटकांचे व्हिसा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई शेअर बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी मध्ये घसरगुंडी कायम

ANI Tweet

दरम्यान सातत्याने मुंबई शेअर बाजार मध्ये पडझड पहायला मिळत असल्याने आता 2600 पेक्षा अधिक अंकांनी सेन्सेक्स पडल्यानंतर तो 33 085 पर्यंत आला आहे. तर निफ्टीमध्येही 798 अंकांनी घसरण झाल्याने ती 9961 इतकी खाली आली आहे. यामध्ये टाटा स्टील्स, अ‍ॅक्सिस बॅंक, ओएनजीसी, अ‍ॅक्सिस बॅंक यांचे शेअर्स 11% पेक्षा अधिक खाली घसरले आहे. दरम्यान अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपया खाली घसरला असून तो 74.50 इतका झाला आहे.

मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच जागतिक मार्केटवरही त्याचा परिणाम झाला आहे. आशिया-पॅसिफिक शेअर हे जपान बाहेर 4.1% नुकसानीमध्ये आहेत. हा 2019 च्या पूर्वाधातील निच्चांक आहे. तर जपानच्या Nikkei मध्येही 5.3% घट आहे. साऊथ कोरियामध्ये KOSPI देखील 4.6% घसरले आहे. हा सुमारे मागील साडे चार वर्षातील निच्चांक आहे.