Ajmer Man Gifts Plot of Land on Moon: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला मिळाली अनोखी भेटवस्तू; राजस्थानच्या तरुणाने बायकोसाठी चंद्रावर खरेदी केली 3 एकर जमीन
ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला.
Ajmer Man Gifts Plot of Land on Moon: तुम्ही जोडप्यांना प्रेमात आकुंठ बुडताना पाहिले असेलचं. ज्यात मुलगा आपल्या प्रियसीला चंद्र, तारे तोडून आणून देण्याचं आश्वासन देत असतो. राजस्थानच्या अजमेर येथे राहणार्या धर्मेंद्रने हे करून दाखवलं आहे. धर्मेंद्रने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला चंद्रावर चंद्रावर 3 एक्कर जमीन गिफ्ट म्हणून दिली आहे. धर्मेंद्र अनीजा यांनी सांगितलं की, लग्नाच्या आठव्या वाढदिवासानिमित्त त्याने पत्नी सपना अनीजाला खास गिफ्ट देण्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी केली. 24 डिसेंबर हा आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. यावेळी मला सपनासाठी काहीतरी विशेष करायचं होतं. प्रत्येकजण लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या जोडीदाराला कार किंवा दागिन्यांसारख्या वस्तू गिफ्ट देत असतो. परंतु, मला सपनासाठी काहीतरी वेगळे करायचं होतं. म्हणून मी तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी केली. (हेही वाचा - Shocking: कुत्र्यावरुन मुलगा-वडिलांमध्ये तुफान राडा, दोघांनी एकमेकांवर झाडल्या गोळ्या)
धर्मेंद्र अनिजाने ही जमीन लुना सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून विकत घेतली आहे. धर्मेंद्र अनिजा यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला. या खरेदीमुळे मी आनंदी आहे. मला वाटते की, चंद्रावर जमीन विकत घेणारा मी राजस्थानमधील पहिला व्यक्ती आहे.
दरम्यान, सपना अनिजा यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या भेटवस्तूविषयी बोलताना सांगितलं की, मला धर्मेंद्रकडून अशाप्रकारच्या गिफ्टची अपेक्षा नव्हती. मात्र, या अनोख्या गिफ्टमुळे मी खूप आनंदी आहे. तो मला एवढं वेगळ आणि खास गिफ्ट देईल, याची मला अपेक्षा नव्हती.
आमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त पार्टीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत मला खरोखरचं चंद्रावर असल्याचा भास होत होता. या कार्यक्रमाच्या वेळी धर्मेंद्रने मला प्रॉपर्टीच्या कागदपत्रांचे प्रमाणपत्र दिले. काही महिन्यांपूर्वी अभिनेता शाहरुख खान आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने, बोधगया येथील रहिवासी नीरज कुमार यांनीदेखील वाढदिवसाच्या दिवशी चंद्रावर एक एक्कर जमीन खरेदी केली होती.