New COVID Variant In India: चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतात आढळला कोरोनाचा नवीन JN.1 सबवेरियंट; काय आहेत लक्षण? जाणून घ्या

अशा परिस्थितीत, त्याची लक्षणे कोविड-19 च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत की नाही हे शोधणे कठीण आहे.

COVID-19 New Variant | Photo: Pixabay

New COVID Variant: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारी अजूनही थांबयचे नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप दूर झालेला नाही. अनेक वेळा या विषाणूच्या विविध प्रकारांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. चीनमध्ये कोरोनाचे नवीन सबवेरियंट (Corona New Subvariant) जेएन.1 (JN.1) ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

कोरोनाचा हा नवीन सबवेरियंट प्रथम लक्झेंबर्गमध्ये आढळून आला. त्यानंतर यूके, आइसलँड, फ्रान्स आणि अमेरिकेतही त्याची प्रकरणे दिसू लागली. एवढेच नाही तर भारतातच कोरोनाच्या या सबवेरियंटचे प्रकरण समोर आले आहे. अलीकडेच, केरळमध्ये या नवीन सबव्हेरिएंट JN.1 ची पुष्टी झाली आहे. ही बाब समोर येताच आरोग्य यंत्रणांची चिंचा पुन्हा एकदा वाढली आहे. (हेही वाचा - Covid-19: 'कोविड-19 विषाणू फुफ्फुसात 2 वर्षांपर्यंत राहू शकतो'; अभ्यासात झाला खुलासा)

JN.1 व्हेरिएंट -

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोनाचे हे सबवेरियंट ओमिक्रॉन सबवेरियंट BA.2.86 चे वंशज आहे, ज्याला 'पिरोला' असेही म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, JN.1 आणि BA.2.86 मध्ये फक्त एकच बदल आहे आणि तो म्हणजे स्पाइक प्रोटीनमधील बदल. स्पाइक प्रोटीन देखील स्पाइक म्हणून ओळखले जाते. हे व्हायरसच्या पृष्ठभागावर लहान स्पाइक्ससारखे दिसते. या व्हेरिएंटचा संसर्ग अधिक वेगाने होतो.

JN.1 ची लक्षणे काय आहेत?

सीडीसीच्या मते, कोरोनाच्या या नवीन सबवेरियंटची कोणतीही विशिष्ट लक्षणे अद्याप दिसलेली नाहीत. अशा परिस्थितीत, त्याची लक्षणे कोविड-19 च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत की नाही हे शोधणे कठीण आहे. जर आपण कोरोनाच्या सामान्य लक्षणांबद्दल बोललो तर त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो-

नवीन प्रकार किती धोकादायक आहे?

सध्या, JN.1 बाबत कोणतीही तपशीलवार माहिती समोर आलेली नाही. सीडीसीच्या मते, या प्रकाराची वाढती प्रकरणे पाहता असे म्हटले जाऊ शकते की एकतर ते अधिक संसर्गजन्य आहे किंवा ते आपल्या रोगप्रतिकार शक्ती नष्ट करते. सध्या जेएन.1 हे कोरोनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या प्रकारांपेक्षा जास्त धोकादायक आहे की नाही याचा कोणताही पुरावा नाही.