Delhi Police Arrived at Atishi's Home:अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता क्राइम ब्रँचचे पथक पोहोचले आतिशी यांच्या घरी; काय आहे आमदारांच्या घोडेबाजाराचे प्रकरण? वाचा सविस्तर

याआधी शनिवारी गुन्हे शाखेची टीम दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती.

Delhi Police Arrived at Atishi Home (PC - X/ANI)

Delhi Police Arrived at Atishi's Home: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party, AAP) भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याचे प्रकरण जोर धरू लागले आहे. दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) गुन्हे शाखेचे पथक रविवारी दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी (Atishi) यांच्या निवासस्थानी पोहोचले. रिपोर्ट्सनुसार, टीम जेव्हा तिच्या आतिशी यांच्या घरी पोहोचली तेव्हा त्या घरी नव्हत्या. मात्र, गुन्हे शाखेचे पथक अतिशी घरी येण्याची वाट पाहत होते.

दरम्यान, आतिशी आप नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा आणि प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांच्यासह मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी होत्या. याआधी शनिवारी गुन्हे शाखेची टीम दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. (हेही वाचा - Delhi Liquor Policy Case: केंद्रीय एजन्सीने जारी केलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध कोर्टात दाखल केली तक्रार)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह कॅबिनेट मंत्री आतिशी यांनाही दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नोटीस मिळणार नाही. आतिशी यांनी त्यांच्या कॅम्प ऑफिसच्या अधिकाऱ्याला नोटीस स्विकारण्यासंदर्भात सूचना केली आहे.

पहा व्हिडिओ - 

काय आहे प्रकरण?

दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आम आदमी पार्टीच्या आरोपाची चौकशी करत आहे. ज्यामध्ये आपचे सरकार पाडण्यासाठी भाजपने 25-25 कोटी रुपयांना आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिस सरकारला पुरावे मागण्यासाठी नोटीस देत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif