AC Burst In Noida: नोएडा सेक्टर 63 येथील कार्यालयात एसीचा स्फोट, इमारतीला भीषण आग
आगीमुळे घटनास्थळी कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
AC Burst In Noida: नोएडा (Noida) च्या सेक्टर 63 मध्ये असलेल्या कार्यालयात शुक्रवारी एसी स्फोट (AC Explosion) झाला. एसी स्फोटामुळे इमारतीला आग लागली. आगीमुळे घटनास्थळी कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
नोएडाच्या सेक्टर 100, लोटस बुलेवर्ड सोसायटीमध्ये गुरुवारी अशीच घटना घडली होती. जिथे एसी फुटला होता. नोएडा फायर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या उन्हाळ्यात 10 ते 12 एसी स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नोएडासह देशभरात एसीला आग लागण्याच्या घटना पहायला मिळत आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये कडाक्याच्या उष्णतेमुळे विजेची कमाल मागणी विक्रमी पोहोचली आहे. उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी घरे आणि कार्यालयांमध्ये एअर कंडिशनर आणि कुलरचा वापर वाढल्याने विजेचा वापर वाढत आहे. मात्र, हे एसी घरे किंवा कार्यालयात आगीचे कारणही ठरत आहेत. (हेही वाचा - UP Road Accident: अमेठीमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या वाहनांना कंटेनरने दिली धडक, अपघातात तीन ठार)
अशी घ्या काळजी -
- तुमच्या घराची किंवा ऑफिसची वायरिंग करताना नेहमी ब्रँडेड वायर्स लावा.
- स्टॅबिलायझरशिवाय एसी चालवू नका.
- सावलीच्या ठिकाणी एसी कॉम्प्रेसर लावा.
- उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच एसीची सर्व्हेसिंग करा.
- एसीमधून कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा ठिणगी आल्यास त्याची त्वरित तपासणी करा.
- सतत एसी चालवू नका.
- 5-6 तास एसी चालवल्यानंतर काही काळासाठी तो बंद ठेवा.
दरम्यान, 25 मे रोजी नोएडा येथील सेक्टर-30 येथील चाइल्ड पीजीआय हॉस्पिटलच्या निवासी संकुलाच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एवढा मोठा स्फोट झाला होता. यानंतर फ्लॅटला आग लागली. एसी स्फोटाचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षारक्षकांनी वेळीच आग आटोक्यात आणली.