'दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने दिला नव्या राजकारणाला जन्म' आप नेते अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Election Results 2020) निकाल आज जाहीर होत असून या निवडणुकतही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Election Results 2020) निकाल आज जाहीर होत असून या निवडणुकतही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला (AAP) स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी सत्तेवर बसण्याचा कौल दिल्याचे प्राथमिक कलांमधून समोर आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत त्यांनी जनतेचे आभार मानले आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने नव्या राजकारणा जन्म दिला आहे. हा देशासाठी शुभ संदेश आहे. हा आपचा विजय नसून दिल्लीतील त्या जनतेचा विजय आहे, ज्यांनी दिल्लीपुत्राला जिंकवून दिले, असेही केजरीवाल म्हणाले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय जवळपास निश्चित झाला असून राज्यात दुसऱ्यांदा बहुमताने विजय मिळवणारी सरकार ठरणार आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. तसेच या निवडणुकीतही काँग्रेसने निराशाजनक कामगिरी केली आहे, तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टीला म्हणजेच आपला 5 ते 63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. हे देखील वाचा- Delhi Vidhansabha Elections Results 2020: 'भाजप'च्या भ्रमाचा भोपळा फुटला'; उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांना शुभेच्छा देत BJP वर साधला निशाणा
एएनआयचे ट्वीट-
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण 672 उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यात 593 पुरूष तर, 79 महिलांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण 62.49 टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 5 टक्के कमी मतदान झाले आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 36 जागेवर विजय मिळवून बहुमतांचा आकडा गाठवा लागेल. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैंकी 67 जागेवर विजय मिळवला होता.