Madhya Pradesh: वेज बिर्याणीमध्ये मासांचे तुकडे सापडल्याने भडकला तरूण, रेस्टॉरंट मालकावर गुन्हा दाखल
त्यानंतर त्याने रेस्टॉरंट मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली, त्यानंतर त्यांनी त्याची माफी मागितली.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील (Indore) विजय नगर भागात एका रेस्टॉरंटच्या (Restaurant) मालकावर सोमवारी एका शाकाहारी व्यक्तीला मांसाहारी पदार्थ दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश दुबे नावाच्या माणसाने व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिली होती, पण त्याला त्याच्या जेवणात हाडे दिसली. त्यानंतर त्याने रेस्टॉरंट मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली, त्यानंतर त्यांनी त्याची माफी मागितली. आकाशने विजय नगर पोलिस ठाण्यात (Vijay Nagar Police Station) एफआयआर दाखल केला. विजय नगर पोलिसांनी रेस्टॉरंट मॅनेजर स्वप्नील गुजराती विरोधात कलम 298 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. हेही वाचा Nasal Vaccine: भारतात जानेवारीच्या अखेरीपासून नेझल व्हॅक्सीन देण्यास सुरुवात होणार पण फक्त 'त्या' लोकांनाचं घेता येणार नेझल व्हॅक्सीन
सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त संपत उपाध्याय यांनी एएनआयला सांगितले.