Bihar Bhagalpur Accident: चाक फुटल्याने अनियंत्रित ट्रकची कारला धडक, सहा जण ठार, बिहारमध्ये भीषण अपघात

सामानाने भरलेल्या ट्रकची धडक एसयुव्ही कारला लागल्याने हा अपघात घडून आला.

Bihar Bhagalpur Accident: PC TWITTER

Bihar Bhagalpur Accident: बिहारमधील (Bihar) भागलपूरमध्ये सोमवारी रात्री उशिरा कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सामानाने भरलेल्या ट्रकची धडक एसयुव्ही कारला लागल्याने हा अपघात घडून आला. हा अपघात घोघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमपूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 80 वर घडला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अपघाताची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. (हेही वाचा- महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी (Watch Video))

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसयुव्ही कारचा अपघात झाला. कारमधील प्रवाशी एका लग्नाच्या कार्यक्रमात गेले होते. मुंगेरमधील धापरी ते कहालगावच्या श्रीमतपूरला जात होते. त्यावेळी भरधाव ट्रकचा टायर फुटल्याने अनियंत्रित झाला आणि त्याची धडक कारला लागली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु ठेवले. घटनास्थळावरून सर्व मृतदेहांना तात्काळ रुग्णालयात नेले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. अपघातामुळे कार संपुर्ण उलटली आणि त्यामुळे सहा जणांचा मृत्यू जागीच झाला. कार मधल्या प्रवाशांची ओळख अद्याप समोर आली नाही.