Hyderabad Student Dies Heart Attack: विद्यार्थ्याला चालता-चालता अचानक आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू, Watch Video

हैदराबाद जवळील CMR अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीटेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये मित्रासोबत फिरत असताना सचिन हा विद्यार्थी अचानक जमिनीवर पडला.

Hyderabad Student Dies Heart Attack: विद्यार्थ्याला चालता-चालता अचानक आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू, Watch Video
Heart Attack | (Photo credits: Pixabay)

Hyderabad Student Dies Heart Attack: तेलंगणात अतिशय वेदनादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तेलंगणात 10 दिवसांच्या कालावधीत अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची ही पाचवी घटना आहे. ही घटना हैदराबादमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

TOI नुसार, हैदराबाद जवळील CMR अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीटेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये मित्रासोबत फिरत असताना सचिन हा विद्यार्थी अचानक जमिनीवर पडला. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थ्याला पडण्याआधी डळमळीत पावले टाकताना दिसत आहे. पडल्यानंतर त्याचे मित्र त्याला उचलण्यासाठी धावले. हा विद्यार्थी मूळचा राजस्थानचा होता. सचिनला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला वाचवता आले नाही. (हेही वाचा - Heart Attack On Camera: लग्नाच्या वरातीत नाचताना तरुणाला हृदयविकाराचा झटका; जागेवर मृत्यू; व्हिडिओ व्हायरल)

तथापी, मंगळवारी रात्री उशिरा हैदराबादच्या लालपेट भागातील प्रोफेसर जयशंकर इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळताना 38 वर्षीय श्याम यादवचा मृत्यू झाला. त्याला शासकीय गांधी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आणि 27 फेब्रुवारी रोजी निर्मल जिल्ह्यातील पारडी गावात एका 19 वर्षीय तरुणाचा त्याच्या नातेवाईकाच्या लग्नात नाचताना मृत्यू झाला.

याशिवाय, चार दिवसांपूर्वी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना 24 वर्षीय पोलीस हवालदार जमिनीवर कोसळला होता. फेब्रुवारी महिन्यातील अशी पहिलीच घटना शहरातील कालापठार परिसरात 20 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. वराला हळद लावताना एका मध्यमवयीन व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला.

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2023 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).