Uttar Pradesh: मुरादाबादमध्ये भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण, डेअरी मालकावर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ एकाने फोनमध्ये कैद केला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तो व्यक्ती निष्पाप कुत्र्याला काठीने बेदम मारहाण करत आहे.

Uttar Pradesh: मुरादाबादमध्ये भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण, डेअरी मालकावर गुन्हा दाखल
Street Dogs | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुरादाबादमध्ये एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ एकाने फोनमध्ये कैद केला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तो व्यक्ती निष्पाप कुत्र्याला काठीने बेदम मारहाण करत आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी सदर व्यक्तीची दखल घेतली आहे. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आले असे पोलिसांनी माहिती दिली. (हेही वाचा- बहराइचमध्ये प्रेमप्रकरणावरून पित्याने मुलीचा कुऱ्हाडीने केला शिरच्छेद; पोलिसांकडून अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुराबादामधी एका डेअरी मालकाने कुत्र्याला मारहाण केली. कुत्र्याला मारत असताना जमावाने बघ्याची भुमिका घेतली. त्या प्राण्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. घटनास्थळी उपस्थित लोकांना ही घटना आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल 

 नेटकरी संतापले 

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तो व्यक्ती कुत्र्याला सतत काठीने मारहाण करत आहे. अखेर कुत्रा गंभीर जखमी होते. तो वेदनेने ओरडत आहे. तरीही त्याला वाचवण्यसाठी कोणीही पुढे आले नाही. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर संताप व्यक्त केला. त्याला पोलिसांच्या ताब्यात घ्या आणि गुन्हा दाखल करा असं एकाने लिहले आहे. घटनास्थळी एकाने त्याला विचारले की कुत्र्याला अमानुषपणे का मारत आहे? यावर त्याने सांगितले की, कुत्र्याने त्याचे दुकानातील काही वस्तूंचे नुकसान केले म्हणून त्याला मारत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2024 07:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).