Lucknow Gang Rape Case: लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, हातरस येथील खळबळजनक घटना
लखनऊ येथील मुझफ्फरनगर येथे लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे
Lucknow Gang Rape Case: लखनऊ येथील मुझफ्फरनगर येथे लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मुलीवर शनिवारी रात्री दोघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींवर आयपीसी कलम 376 डी ( सामुहिक बलात्कार ) आणि पोस्को कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- घरगुती भांडणातून पत्नीची हत्या; हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केल्याचा बनाव रचणारा आरोपी पती अटकेत)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हातरस येथे घडली असून मुलीवर जिल्ह्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केले असून दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. लग्न समारंभाचे काम संपून मुलगी घरी जात होती. पहाटे तीनच्या दरम्यान हातसर जिल्हात दोघे जण रस्त्यात आले. तीला अडवून तिला जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला आणि तीला बळजबरीने शेतात घेऊन गेले. दोघांनी अमानुषपणे शेतात पीडितेवर बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मुलीची तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. एका आरोपीला ताब्यात घेतले असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे. पीडित मुलगी ही अलीगडची रहिवासी आहे. या घटनेनंतर गावात एकाच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2024 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

