Viral Video: कर्नाटकात मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थिनींनी धु धु धुतलं; पहा व्हायरल व्हिडिओ

चिन्मयानंद असं या शिक्षकाचं नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थिनींनी दिला चोप (PC - Twitter/ @KeypadGuerilla)

Viral Video: कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील काटेरी गावात एका वसतिगृहात एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याच्या आरोपावरून शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींनी झाडू आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या वसतिगृहाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आरोपी रोज संध्याकाळी वसतीगृहात यायचा आणि मुलींना त्याच्या खोलीत बोलावून त्रास देत असे. चिन्मयानंद असं या शिक्षकाचं नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विद्यार्थिनींचा आरोप आहे की, आरोपी मुख्याध्यापक त्यांना अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडत असे आणि अयोग्यरित्या स्पर्श करत असे. विद्यार्थिंनीनी या प्रकरणाबाबत काहीही उघड केल्यास विद्यार्थिनींच्या बदली प्रमाणपत्रांवर अवमानकारक टिप्पणी केली जाईल, अशी धमकीही या शिक्षकाने विद्यार्थिनींना दिली होती. (हेही वाचा - UP Shocker: उधारीचे 20 रुपये न दिल्याने दुकानदाराकडून तरुणाला मारहाण; पीडित मुलाने मारली ट्रेनसमोर उडी, Watch Viral Video)

या शिक्षकाचे लैगिंक अत्याचार वर्षानुवर्षे सहन केल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला आहे. बुधवारी सायंकाळी आरोपी मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीला वसतिगृहातील आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर सर्व मुली तिच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला झाडू आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.

दरम्यान, विद्यार्थिनींनी घडलेल्या सर्व प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थही वसतिगृहाजवळ जमले आणि त्यांनी आरोपींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. केआरएस पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले. मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डनच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.