Uttar Pradesh: महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला विवस्त्र करून मारहाण; आग्रा येथील घटना

दोन वर्षांपूर्वी पोलिस दलात रुजू झालेले पोलिस अधिकारी संदीप कुमार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तपासासाठी गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि मारहाण केली असं म्हटलं आहे.

Beaten up (PC - Pixabay)

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना पकडले गेल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याला विवस्त्र करून, खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. गावकऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्याला विवस्त्र केले. त्यानंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करण्यात आले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती मिळताच आग्राच्या पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित केले आणि त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आहे. याशिवाय, घटनेशी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Pre-Wedding Photoshoot at Police Station: पोलीस जोडप्याने फिल्मी अंदाजामध्ये स्टेशनमध्ये केले प्री-वेडिंग फोटोशूट; व्हिडिओ व्हायरल (Watch))

ग्रामस्थांनी सोमवारी उपनिरीक्षकाच्या विरोधात आंदोलन करून त्याच्यावर कारवाईची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी पोलिस दलात रुजू झालेले पोलिस अधिकारी संदीप कुमार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तपासासाठी गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि मारहाण केली असं म्हटलं आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान, पश्चिम दिल्लीतील रघुबीर नगरमध्ये शुक्रवारी रात्री एका 50 वर्षीय पोलिसावर एका महिलेसह तीन जणांनी निर्घृण हल्ला केला. एमजी राजेश असे पीडित तरुणाचे नाव असून तो ड्युटी संपवून घरी परतत असताना हा हल्ला झाला. आरोपी एका महिलेसोबत बेदरकारपणे गाडी चालवत होते. त्यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या कारला धडक दिली. यानंतर काही वेळातच त्यांनी राजेशला गाडीतून खेचून बाहेर काढले आणि नंतर लोखंडी रॉड आणि विटांनी मारहाण केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif